शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , शुक्रवार, 15 जानेवारी 2016 (11:35 IST)

मुंबई पोलीस आयुक्तपदी पडसलगीकर?

भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) ज्येष्ठ अधिकारी दत्तात्रय पडसलगीकर मुंबईचे नवे पोलीस आयुक्त होतील, हे निश्चित झाले. विद्यमान आयुक्त अहमद जावेद यांची सौदी अरेबियात भारतीय राजदूतपदी नियुक्ती झाली आहे. अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जा असलेले पडसलगीकर ‘आयबी’मध्ये विशेष संचालक पदावर प्रतिनियुक्तीवर होते.

आयुक्तपदी नियुक्ती करताना त्यांना महासंचालक पदाच्या दर्जावर बढती दिली जाईल.