सत्तेत सहभागाचे शिवसेनेचे संकेत
तुम्ही सर्वांनी भरभरुन प्रेम दिले मग सत्तेची फिकीर नाही, सत्ता तर मिळेलच ती जाते कुठे... अशा शब्दात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपासमवेत सत्तेत सहभागी होण्याचे संकेत दिले.
कोकण दौर्यावर असलेले ठाकरे पाली येथे बोलताना म्हणाले, शिवसेना पावलोपावली कोकणातील जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिला. विधानसभा निवडणुकीत कोकण भगवामय करून टाकणाºया कोकणाच्या विकासासाठीच दौºयातून माहिती घेऊन भविष्यात योजना राबविण्याचा माझा मानस आहे.