शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 25 फेब्रुवारी 2023 (15:39 IST)

९० वर्षीय आजीच्या डोळ्यातून निघाला १५ सेमी लांब जिवंत जंत

रत्नागिरी येथील चिपळूणमध्ये राहणाऱ्या एका ९० वर्षीय आजीच्या डोळ्यातून १५ सेमी लांब जिवंत जंत काढण्यात आला. येथील लाईफ केअर हॉस्पिटलचे नेत्रतज्ज्ञ व कॉर्निया सर्जन डॉ. नदीम खतीब यांनी यशस्वीपणे केलेल्या केलेल्या शस्त्रक्रिया व उपचारांमुळे आजींची दृष्टी वाचली आहे.
 
डॉक्टरांनी आजींच्या डोळ्यातून चक्क १५ सेंटीमीटरचा जिवंत जंत Ascaris worms शस्त्रक्रिया करून बाहेर काढला आहे.
 
या वृद्ध महिलेला तपासणीला येण्यापूर्वी मागील चार-पाच दिवसांपासून डोळ्याला सूज व वेदना जाणवत होती. कुटुंबीयांनी आजींना चिपळूण येथील लाईफ केअर हॉस्पिटलमधे दाखल केल्यावर नेत्रतज्ज्ञ डॉ. नदीम खतीब यांनी दुर्बिणीतून तपासणी केली ज्यात त्यांच्या उजव्या डोळ्यात अस्कॅरीस लुब्रिकॉईड्स असल्याचं निदान झालं.
 
अशात ऑपरेशन करणे गरजेच असल्यानुसार डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करून महिलेच्या डोळ्यातून जिवंत जंत काढलं ज्याने आजींना आराम मिळाला.
 
डॉक्टरांप्रमाणे हा जंत साधारणपणे खाण्यातून पोटात जाऊन अंडी घालतो आणि रक्तवाहिन्यावाटे शरीराच्या कोणत्याही भागात पोहोचू शकतो.