बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : गुरूवार, 27 एप्रिल 2023 (18:58 IST)

15 वाहने एकमेकांना धडकली

accident
पुणे- दुपारी एकच्या सुमारास खोपोली एक्झिट येथे मुंबई द्रुतगतीमार्गावर वाहने एकमेकांना धडकून विचित्र अपघात झाला असून काही जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सुदैवाने या अपघातात जीविहितहानी झालेली नाही. या अपघातामुळे मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती.
 
पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव ट्रकच्या चालकाचे नियंत्रण सुटून किंवा ब्रेक निकामी झाले, त्यानंतर या ट्रकची वाहनांना धडक बसली असावी असाही एक प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.  बोरघाटात तीव्र उतारावर ही घटना घडली आहे. अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना खोपोली येथील रुग्णालयात घेऊन जाण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, अपघातग्रस्त सामाजिक संस्था घटनस्थळी पोहचल्या.