गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 3 जानेवारी 2022 (08:33 IST)

नाशिक शहरातील ‘या’वसतीगृहातील १७ विद्यार्थिनी कोरोना पॉझिटिव्ह

नाशिक शहरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे.नाशिक शहरातील पंचवटीतील केबीएच दंत महाविद्यालयातील तब्बल १७ विद्यार्थिनी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत.नाशिक शहरातील पंचवटीतील केबीएच दंत महाविद्यालयातील एकूण ५२ विद्यार्थिनींचे शनिवारी स्वॅब घेण्यात आले होते.
 
त्यापैकी एकूण १७ विद्यार्थिनी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. या विद्यार्थिनींना वसतिगृहातच विलगीकरणात ठेवण्यात आले असून सगळ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याचप्रमाणे महाविद्यालय इमारतही प्रतिबंधित क्षेत्र म्हणून सील करण्यात आली आहे.