गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 17 मे 2022 (08:21 IST)

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा १७ वी दीक्षांत सोहळा आज ; असे आहे यंदाच्या सोहळ्याचे खास वैशिष्ट्य

yashwantrao-chavan-maharashtra-open-university
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा २७ वा दीक्षांत समारंभ मंगळवार दि. १७ मे २०२२ रोजी सकाळी ११ वाजता विद्यापीठ आवारात होत आहे. तब्बल पावणे दोन लाख विद्यार्थ्यांना पदवी प्रदान होणार . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी असून, त्यांची या सोहळ्याला ऑनलाईन उपस्थिती लाभणार आहे. तसेच प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना. उदय सामंत उपस्थित राहणार असून, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा एएफसी इंडियाचे अध्यक्ष प्रा. चारुदत्त मायी स्नातकांना उद्देशून दीक्षांत भाषण करणार आहेत. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे यावर्षी एकूण एक लाख ७६ हजार ११३ विद्यार्थी पदवी प्राप्त करीत असून, नोंदणी केलेले स्नातक या सोहळ्याला उपस्थित राहून पदवी स्वीकारणार आहेत, अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांनी दिली.
 
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा यंदाचा २७ वा दीक्षांत समारंभ आहे. मागील दोन वर्ष करोनामुळे प्रत्यक्ष दीक्षांत सोहळा होवू शकला नाही. मागील वर्षी विद्यापीठाने नवतंत्रज्ञानाचा वापर करत व्हर्चुअल रियालिटी पद्धतीने दीक्षांत समारंभ आयोजित केला होता. विद्यापीठातील आठ विद्याशाखा व राज्यभरातील आठ विभागीय केंद्रे आणि एक हजार ८७४ अभ्यासकेंद्रे यांच्यामार्फत विद्यापीठातर्फे राज्यभरात ज्ञानदानाचे कार्य केले जाते.
 
यंदा विद्यापीठात विविध अभ्यासक्रमांसाठी पाच लाख ५० हजाराहून अधिक विद्यार्थी प्रविष्ट आहेत. पीएच. डी. , एम. फील, पदव्युत्तर पदवी, पदवी व पदविका अशा विविध प्रकारच्या जवळपास १३८ शिक्षणक्रम एक लाख ७६ हजार ११३ विद्यार्थ्यांना यंदा पदवी प्रदान केली जाणार आहे. विद्यापीठ प्रशासनातर्फे जय्यत तयारी करण्यात येत आहे. दीक्षांत समारंभासाठी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने व वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे व परीक्षा नियंत्रक भटू प्रसाद पाटील यांनी केले आहे.
 
दीक्षांत समारंभासाठी उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाकडे येण्यासाठी नाशिक शहरातून सिटी बस सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. नाशिकरोड स्थानकातून सकाळी ०९:०० वाजता बस सुटेल, पंचवटी-निमाणी बस स्थानकातून ०९:१५, मध्यवर्ती मेळा बस स्थानकातून (सी,बी.एस.) ०९:३० तर अशोकस्तंभापासून ०९:४५ वाजता सिटी बस सुटणार आहेत.
 
दीक्षांत समारंभात विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात येणारी प्रमाणपत्रे वैशिष्ट्यपूर्ण असून त्यावर विद्यार्थ्याचे छायाचित्र देखील असणार आहे. विद्यार्थ्याचे गुणपत्रकावरील छायाचित्रच प्रमाणपत्रावर झळकणार आहे. शिवाय क्यू आर कोडही प्रमाणपत्रावर असून तो स्कॅन करून प्रमाणपत्राची वैधता पडताळणी करता येऊ शकेल. प्रमाणपत्रावर विद्यार्थ्याच्या आईचे नावही प्रसिद्ध केलेले असेल. तसेच दीक्षांत समारंभानंतर सर्व पात्र स्नातकांच्या पदव्या डिजीलॉकर पोर्टलवर उपलब्ध होणार आहेत.