शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 16 मे 2022 (21:39 IST)

सांगलीत पत्नीने पतीच्या डोक्यात घातला रॉड

crime
माधवनगर येथे पत्नीने लोखंडी रॉडने पतीला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत तक्रारदाराने संजयनगर पोलीस स्टेशमध्ये तक्रार दाखल केली आहे.
 
याबाबत अधिक माहिती अशी की, माधवनगर याठिकाणी आंबुडकर हे कुटुंब राहते. आज सकाळी सचिन चंद्रकांत आंबुडकर (वय 35) याने पत्नी अंजली (वय 26) हीला वडिलांचा डबा का केला नाही? यासंदर्भात जाब विचारला. यावेळी पत्नीने मनात राग धरून पतीला शिवीगाळ करून लोखंडे रॉडने कपाळावर व पाठीवर मारून जखमी केले आहे. याबाबत पती सचिन आंबुडकर याने पत्नी अंजली विरुद्ध संजयनगर पोलिसात फिर्याद दाखल केली असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.