सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 28 जून 2021 (12:32 IST)

शहीद तुकाराम ओंबळेंचा सन्मान, नव्या कोळी प्रजातीला दिले नाव

Photo : Twitter
मुंबईवर झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले आणि मरणोपरांत अशोकचक्र पदकाने गौरविले गेलेले सहाय्यक पोलीस अधीक्षक तुकाराम ओंबळे यांचा अनोखा सन्मान केला गेला आहे.
 
पीएचडी स्कॉलर आणि पर्यावरणवादी असलेल्या धुव्र प्रजापती या तरुणाने महाराष्ट्रात दोन कोळ्यांच्या प्रजाती शोधल्या आहेत. ज्यामधील एका कोळ्याला त्याने शहीद तुकाराम ओंबळे यांच्या नावावरुन नाव दिलं आहे. खरं तर ही एक प्रकारची मानवंदनाच आहे. जेव्हा ध्रुवला नव्या प्रजातीचा कोळी सापडला तेव्हा त्याने त्याला Icius tukarami असं नाव दिलं.
 
मुंबईवरच्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानातून आलेल्या दहा दहशतवाद्यांनी सीएसटी रेल्वे स्टेशनवर हल्ला करून नंतर कामा हॉस्पिटलला टार्गेट केले होते. तेथे तैनात पोलिसांवर हल्ला चढवून ६ पोलिसांना ठार केले होते. त्यात एटीएस प्रमुख हेमंत करकरे शहीद झाले होते. कसाब आणि त्याचा साथीदार इस्माईल खान याना गिरगाव चौपाटीवर पोलिसांनी अडविले तेव्हा कसाबच्या हातातील रायफलची नळी पकडून ओंबळे यांनी त्याला अडकविले आणि अन्य पोलिसांना कसाबला जिवंत पकडता आले होते. यात ओंबळे यांच्या शरीरात २७ गोळ्या लागल्याने ते शहीद झाले होते.