मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: भुसाव‍ळ , शुक्रवार, 17 डिसेंबर 2021 (18:27 IST)

21 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

भुसावळमध्येभाजपलामोठा धक्काबसला आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज 21नगरसेवकांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यामुळे नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसलाआहे.  
 
भुसावळ येथे शुक्रवारी दुपारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा मेळावा झाला. त्यात हा प्रवेश सोहळा झाला. याशिवाय अनेक ग्रामपंचायत सदस्यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणारे हे नगरसेवक माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे समर्थक आहेत. राष्ट्रवादी नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत या सर्व नगरसेवाकांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले आहे. त्यामुळे नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचं जळगावमध्ये हे मोठे डॅमेज आहे, भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिरीश महाजन यांना खडसेंनी शह दिला आहे.