1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 14 जानेवारी 2021 (07:18 IST)

धोक्याची घंटा, राज्यात दिवसात तब्बल २३८ पक्ष्यांचा मृत्यू

238 birds
महाराष्ट्रावरील 'बर्ड फ्लू'चं संकट दिवसेंदिवस आणखी गडद होत आहे. राज्यात दिवसात तब्बल २३८ पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या पशूसंवर्धन विभागाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात विविध ठिकाणी एकूण २३८ पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. तर ८ जानेवारीपासून ते आतापर्यंत एकूण २,०९६ पक्ष्यांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.  राज्यात मुंबई, ठाणे, परभणी, दापोली, बीड, अकोला, लातूर, गोंदिया आणि चंद्रपूर भागातील पक्ष्यांचे नमूने हे बर्ड फ्लू संसर्गाचे पॉझिटिव्ह आढळले आहेत. 
 
राज्यात परभणी तालुक्यात सर्वाधिक पक्ष्यांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. एकट्या परभणी तालुक्यात ८०० कोंबड्या बर्ड फ्लूमुळे दगावल्या आहेत. परभणी येथील पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांच्या पथकाने मुरुंबा येथील पोल्ट्री फार्मध्ये जाऊन कोंबड्या ताब्यात घेतल्या होत्या. त्यांचे नमुने पॉझिटिव्ह आढळले आहेत.