30 हजाराची 'मिनी फोर्ड'
सांगलीशहरातील काकानगर या ठिकाणी राहणार्या अशोक संगाप्पा आवटी यांनी अवघ्या 30 हजार रुपये खर्चून 1930 मॉडेलची फोर्ड कार तयार केली आहे. एक लिटर पेट्रोलमध्ये 30 किमी प्रतितास वेगाने धावणारी ही कार खरोखरच मस्त बनली आहे.
अशोक आवटी यांचे कर्नाल रस्त्यावरील काकानगर येथे दुचाकी व चारचाकी वाहनांचे गॅरेज आहे. त्यांच्या फावल्या वेळात काहीतरी वेगळं करण्याची आवड आवटी यांच्या मनात अली. त्यांच्या मनात जुनी फोर्ड गाडी बसली आणि यासाठी त्यांनी या गाडीला M80 मोपेडचे इंजिन बसवले आहे. रिक्षाचे सुटे भाग वापरले. ते या गाडीला बनवण्यासाठी दोन वर्षे लढत होते. मात्र प्रत्यक्षात या गाडीचे काम 15 दिवसांपूर्वी पूर्ण झाले.
ही आलिशान कार एकावेळी चार प्रवासी घेऊन जाऊ शकते. कारची बॉडी बनावट आहे आणि मजबुतीकरणासाठी आतील बाजूस कोन केलेले लोखंड आहे. सेम टू सेम पहिल्या दृष्टीक्षेपात ही गाडी फोर्ड कंपनीची आठवण करून देते. गाडीकडे बघितल्यावर हि गाडी ऐतिहासिक वाटते. त्यावरील रंग आणि चित्रेही ऐतिहासिक शैलीतील आहेत.