शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शनिवार, 1 ऑक्टोबर 2022 (13:13 IST)

4 म्हशी, 250 कोंबड्या आगीत जळून ठार

fire farm
वडवणी तालुक्यातील बावी तांडा परिसरात ही आगीची घटना घडली आहे. 33 केव्हीची विद्युत तार तुटून दामू राठोड आणि शेषेराव राठोड यांच्या तब्बल 13 एकर ऊस जळून खाक झाला असून प्रल्हाद आडे यांचाही गोठा जळून खाक झालाय. तसेच 4म्हशी आणि 250 कोंबड्याांचाही मृत्यू झाला आहे. आग लागल्यानंतर जीव वाचवण्यासह संसार उपयोगी साहित्य वाचवण्यासाठी शेतकरी कुटुंबाची अक्षरश: धावपळ झाली होती. 
  
 या महिनाभरात महावितरणचा कारभाराने अनेक तालुक्यांमध्ये कित्येक एकर ऊस जळून खाक झाला आहे. यामध्ये अनेकांचा जीवदेखील यामध्ये गमवावा लागला आहे.