1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 17 जुलै 2021 (08:17 IST)

ईडीकडून अनिल देशमुख यांची ४ कोटी २० लाखाची संपत्ती जप्त

राज्याच् माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. ईडीने अनिल देशमुख यांची ४ कोटी २० लाख रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. ईडीची कारवाई अनिल देशमुख यांच्यासाठी मोठा झटका मानला जात आहे. तसंच या कारवाईनंतर देशमुख यांच्या अडचणी अधिक वाढणार असल्याच्या शक्यता आहेत.
 
ईडीने अनिल देशमुख यांची स्थावर मालमत्ता जप्त केली आहे. या स्थावर मालमत्तेची किंमत ४ कोटी २० लाख एवढी आहे. पीएमएलए कायद्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.जप्त केलेल्या संपत्तीत वरळीमधला एक फ्लॅट आणि पनवेलमधील एक जमीनीचा समावेश आहे.
 
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर कथित १०० कोटी वसुलीचे आरोप केले आहेत. या आरोपांचा तपास सध्या ईडीकडून सुरु आहे.या प्रकरणाचा तपास करत असताना ईडीने अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपुरातील घरं तसंच कार्यालये अशा वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले होते.त्याचबरोबर देशमुख यांचे दोन सचिव ईडीच्या कोठडीत आहेत.