बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 10 जून 2020 (11:35 IST)

बेस्टमधील ५४ कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू

करोनाच्या संसर्ग लागणार्‍या बेस्ट कर्मचाऱ्यांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत ५४ कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू झाल्याचा दावा बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने केला आहे. संघटनेने मृत कर्मचाऱ्यांची संख्या लपविली जात असल्याचा आरोप देखील केला आहे. 
 
आरोग्याशी संबंधित विविध मागण्यांसाठी बेस्ट कर्मचाऱ्यांच्या ११ जून ते १३ जूनपर्यंत आगार व आस्थापनावर मूक निदर्शने केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. 
 
त्यांच्या मागण्या आहे की- 
करोनाबाधित बेस्ट कर्मचाऱ्यांचा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा तपशील जाहीर करावा
बेस्टच्या मृत कर्मचार्‍यांच्या संबंधितांच्या कायदेशीर वारसांना हक्क द्यावा. जाहीर उपक्रमाच्या सेवेत घेण्यात यावे आणि ५० लाख रुपये विमा कवच सुरक्षा देण्यात यावी
शिस्तभंगाच्या कारवाया थांबविण्यात याव्यात
प्रत्येक आगारात वैद्यकीय तपासणी केंद्र सुरू करावे
वडाळा आगार आणि वाहतूक प्रशिक्षण केंद्र तसेच दिंडोशी येथे तात्पुरत्या स्वरूपाचे करोना रुग्णालय उभारावे
यासह विविध मागण्यांसाठी मूक निदर्शने केली जाणार आहेत.