रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 20 फेब्रुवारी 2020 (11:50 IST)

चंद्रपूर अपघातात 6 भाविक ठार, 6 जखमी

चंद्रपूर येथे घडलेल्या भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला असून 6 जण जखमी झाले आहेत. मूल तालुक्यातील केसलाघाट येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव स्कॉर्पिओ गाडीने धडक दिल्याने हा अपघात झाला. 
 
मिळालेल्या माहितीनुसार केसलाघाट गावात बुधवारी रात्री उशिरा हा अपघात झाला. सर्व मृत व्यक्ती चंद्रपुरातील असून गोंदिया येथून देवदर्शनाहून परत येत असताना काळाचा ग्रास बनले.
 
अपघातात जखमी झालेल्यांना मूल येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.