शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 4 मार्च 2023 (14:19 IST)

पेपरमधील चुकांमुळे विद्यार्थ्यांना 6 गुण

exam
बारावीच्या पहिल्याच इंग्रजीच्या पेपरात राज्य शिक्षण मंडळाकडून झालेल्या चुकांच्या पार्श्वभूमीवर 3 मार्च रोजी इंग्रजी विषयाची संयुक्त सभा विषय तज्ज्ञ व सर्व विभागीय मंडळाने प्रमुख नियामक यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. सभेतील अहवालानुसार इंग्रजीच्या पेपरमध्ये त्रुटी असलेल्या प्रश्नाचे गुण विद्यार्थ्यांना देण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोणत्याही विद्यार्थ्यांवर मंडळाकडून झालेल्या चुकीमुळे अन्याय होणार नाहाी असे मंडळाकडून पुन्हा एकदा सदर निर्णय घेऊन स्पष्ट करण्यात आले आहे.