शुक्रवार, 15 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 29 फेब्रुवारी 2020 (16:36 IST)

कोरोनामुळे तेहरानमध्ये महाराष्ट्राचे ६०० भाविक

maharashtra news
कोरोना व्हायरसचा फटका महाराष्ट्रातील ६०० भाविकांना देखील बसला आहे. इराक आणि इराणमध्ये तीर्थयात्रेसाठी गेलेले महाराष्ट्रातील तब्बल सहाशे यात्रेकरू अडकून पडले आहेत. इराणची राजधानी तेहरानमध्ये महाराष्ट्राचे ६०० भाविक गेले होते. मात्र, ‘करोना’च्या साथीमुळे इराक आणि इराणसह तेथील अन्य देशांनी सीमा बंद केल्यामुळे या भारतीय यात्रेकरूंना गेल्या आठ दिवसांपासून तेथेच अडकून पडावे लागले आहे.
 
कोल्हापूरमधल्या साद टूर्स कंपनीने या सहलीचे आयोजन केले होते. या सहलीमध्ये महाराष्ट्रातील ६०० भाविक ३१ जानेवारी रोजी तेहेरानमध्ये पोहोचले. इराकची राजधानी बगदाद येथे प्रसिध्द सुफी संत हजरत गौस पाक जिलानींचा दर्गाह तसेच मोहम्मद पैगंबरांचे नातू हजरत इमामहुसेन आणि त्यांच्या कुटुंबीयांनी ज्या करबलाच्या युध्दात हौतात्म्य पत्करले तेथील स्थळांचे दर्शन घेण्यासाठी हे यात्रेकरू गेले होते. मात्र, इराक आणि इराण आदी देशांनी तेथील सीमा बंद केल्यामुळे ते त्याठिकाणी अडकून आहे.