बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

मालेगाव-सटाणा रस्त्यावर अपघात , ७ ठार

मालेगाव-सटाणा रस्त्यावर अॅपे रिक्षाचा भीषण अपघात झाला. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला. बागलाणच्या शेळीजवळ पहाटेच्या वेळेस अज्ञात वाहनाने अॅपे रिक्षाला धडक दिली आणि यात सात जन ठार झालेत. 
 
पहाटेच्या वेळेस मालेगावकडून सटाण्याकडे अॅपे रिक्षा जात होती. त्या अॅपे रिक्षामध्ये सातजण होते. यात काही व्यावसायिकही होते, जे सामान घेऊन सटाण्याला जात होते. अपघतात सातही जणांचा मृत्यू झाला.