शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 एप्रिल 2022 (10:56 IST)

भिंत अंगावर पडून 7 वर्षाच्या मुलीचा मृत्यू

death
बीडच्या माजलगाव शहरात नगरपालिके कडून ईद निमित्त, मस्जिद परिसर स्वच्छ करण्यासाठी गेलेल्या जेसीबीमुळे  भिंत पडली आणि त्यात 7 वर्षाच्या चिमुकलीचा दबून दुर्देवी मृत्यू झाला. 

माजलगाव येथे इदगा मोहल्ला भागात एक मोठी मस्जिद असून या परिसरातील घाण स्वच्छ करण्यासाठी जेसीबी नगरपालिकेकडून पाठविण्यात आली. ज्या ठिकाणी ही  मस्जिद आहे त्या ठिकाणी अरुंद रास्ता आहे. त्या अरुंद रस्त्यावर बळजबरीने जेसीबी घातली आणि ही जेसीबी मस्जिदच्या जवळ असलेल्या भिंतीजवळ गेली आणि त्यामुळे ही भिंत पडली .भिंत पडली त्यावेळी तिथून सय्यद इकरा निसार ही  7  वर्षाची मुलगी निघत होती.

तिच्या अंगावर ही भिंत पडली त्यात दबून या चिमुकलीचा अंत झाला. या घटने नंतर जेसीबी चालक फरार झाला आहे. नंतर मुलगी मरण पावली पाहता संतप्त नागरिकांनी जेसीबीच्या काचा फोडल्या. या परिसरात वातावरण तणावाचे झाले. या प्रकरणी पोलिसांनी जेसीबी चालक, मालक आणि ठेकेदाराच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस जेसीबी चालकाचा शोध घेत आहे.