मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 8 सप्टेंबर 2020 (16:40 IST)

राज्यात वैद्यकीय प्रवेशातील ७०-३० कोटा रद्द

वैद्यकीय प्रवेशात ७०-३० कोटा रद्द करण्यात आला आहे. यामुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांवर अन्याय होत होता. २०१५ पासून हा कोटा रद्द करण्याची मागणी होत होती. राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी सभागृहात याबाबत घोषणा केली आहे. ७०-३० कोटा पद्धतीमुळे गुणवंत विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशापासून वंचित राहतात, त्यामुळे राज्य सरकारने ही पद्धत रद्द केल्याचं अमित देशमुख यांनी म्हटलं आहे.
 
राज्यात एक महाराष्ट्र, एक मेरिट पद्धत लागू करत असल्याची घोषणा देखील अमित देशमुख यांनी केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर याबाबत निर्णय घेण्यात आला. मराठवाड्यात ६ तर विदर्भात ९ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहेत. ७०-३० कोटामुळे मराठवाडा आणि विदर्भातील विद्यार्थ्यांना याचा फटका बसत होता. असं स्थानिक आमदारांचं म्हणणं होतं.