मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 जुलै 2017 (15:28 IST)

नववी आणि दहावीची भाषांची तोंडी परीक्षा रद्द

नववी आणि दहावीच्या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांना तोंडी परीक्षेच्या माध्यमातून शाळांकडून दिले जाणारे भरमसाठ मार्क आता बंद होणार आहे. भाषांची तोंडी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाषा विषयांसाठीची २० मार्कांची तोंडी आणि ८० मार्कांची लेखी परीक्षा हा नियम बंद करण्याचा निर्णय राज्य शिक्षण मंडळाने गुरुवारी जाहीर केला आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या या निर्णयामुळे यंदा नववीच्या विद्यार्थ्यांना भाषा विषयांची १०० मार्कांची प्रश्नपत्रिका सोडवावी लागणार आहे. दरम्यान, हे बदल यंदा फक्त नववीसाठी असून याची दक्षता शाळांनी घेण्याची सूचनाही करण्यात आली आहे. राज्य शिक्षण मंडळाचा हा निर्णय पुढील शैक्षणिक वर्षांपासून दहावीसाठीही लागू होणार आहे.