गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : सोमवार, 23 डिसेंबर 2024 (09:46 IST)

नवीन मोबाईल न मिळाल्याने सांगलीत 15 वर्षाच्या मुलाची आत्महत्या

suicide
Sangli News: महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील एका 15 वर्षाच्या मुलाने त्याच्या वाढदिवसाला त्याच्या आईने त्याला मोबाईल फोन आणण्यास नकार दिल्याने आत्महत्या केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मिरज शहरात गेल्या शनिवारी रात्री ही घटना घडली. आई आणि बहीण झोपले असताना या मुलाने घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच पोलिसांनी सांगितले की, या मृत मुलाने दोन दिवसांपूर्वी आपला वाढदिवस साजरा केला होता आणि त्याच्या आईकडे मोबाईल फोन मागितला होता. पण, आर्थिक अडचणींमुळे आईने फोन घेण्यास नकार दिला. दुसऱ्या दिवशी कुटुंबीयांना मुलगा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. पोलिसांनी सांगितले की, अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून या संदर्भात तपास सुरू आहे.

Edited By- Dhanashri Naik