गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 25 जून 2024 (11:13 IST)

महाराष्ट्रात नवरदेव-नवरी असलेल्या चालत्या बस ने घेतला पेट

rtc bus fire
महाराष्ट्रातील बुलढाण्यामध्ये बातमी समोर आली आहे. लग्न अतिपूर्ण वरात घराच्या प्रवासाच्या दिशेने निघाली होती. तेव्हा अचानक बस मधून धूर निघायला सुरवात झाली. यामुळे बसला लागलीच रस्त्याच्या बाजूला उभे करण्यात आले. 
 
महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यामध्ये चिखली रस्त्यावर एका बसमध्ये अचानक आग लागली. ही बस लग्नात हुंड्यात मिळलेला सामान घेऊन चंद्रपूर वरून बुलढाणा येथे येत होती. या बसममध्ये नवरदेव-नवरी सॊबत त्यांचे कुटुंबीय देखील होते. 
 
लग्न घटिका आटोपल्यानंतर ही बस वर्हाड घेऊन बुलढाण्याच्या दिशेने निघाली होती. तेव्हा अचानक बस मधून धूर निघायला सुरवात झाली. ज्यामुळे चालकाने लागलीच बस रस्त्याच्या कडेला उभी केली.  व लागलीच बस मधून सर्वांना बाहेर काढण्यात आले. पण यामध्ये नावरीमुलीचा सर्व सामान जाळून राख झाला. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना आज पहाटे घडली आहे.