धक्कादायक : कल्याण-शीळ मार्गाच्या कडेला कचऱ्यात एक दिवसाचे स्त्री जातीचे अर्भक सापडले

new born baby
Last Modified सोमवार, 20 जुलै 2020 (11:21 IST)
भर पावसात कल्याण-शीळ मार्गाच्या कडेला कचऱ्यात एक दिवसाचे स्त्री जातीचे A one-day-अर्भक टाकून दिल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी (18 जुलै) दुपारी उघडकीस आला. शीळ डायघर पोलिसांना याविषयी माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बाळाला ताब्यात घेतले. बाळाची प्रकृती स्थिर असून त्याला नवी मुंबई येथे हलविण्यात आले आहे. याप्रकरणी अनोळखी पालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पालकांचा शोध सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
कल्याण शीळ मार्गावर वाहनांची सतत वर्दळ सुरु असते. शनिवारी Saturday दुपारीही रस्त्यावर वाहनांची वर्दळ होती. पावसाच्या सरीही बरसत होत्या. याचदरम्यान रस्त्यावरुन ये जा करणाऱ्या नागरिकांना रस्त्याच्या कडेला असलेल्या कचऱ्यातून बाळाचा रडण्याचा आवाज आला. थर्माकॉलचे अनेक बॉक्स येथे पडलेले असल्याने नागरिकांनी आवाजाचा शोध घेतला. तर एक नवजात अर्भक लाल कपड्यात गुंडाळलेले आढळून आले. याप्रकरणी शीळ-डायघर पोलिसांना तातडीने कळविण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बाळाला ताब्यात घेतले. शनिवारी दुपारी रिव्हरवूड पार्क परिसरात कल्याण शीळ रोडवरील बाजूच्या कचऱ्यात एक नवजात स्त्री जातीचे अर्भक मिळाले आहे. हे बाळ नुकतेच जन्मलेले आहे, त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्याची प्रकृती उत्तम आहे. सध्या नवी मुंबई नेरुळ येथे त्याला हलविण्यात आले आहे. आजूबाजूच्या परिसरात बाळाच्या पालकांचा शोध घेतला जात आहे. सी. जे. जाधव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, शीळ डायघर पोलिस ठाणे.


यावर अधिक वाचा :

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट ...

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट विमानसेवा सुरू करणार आहे
हैदराबादहून आता मालदीवला जाणे सोपे होईल. खरं तर, परवडणारी सेवा देणारी विमान कंपनीची गोएअर ...

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
प्रत्येक देशात वेगवेगळे कायदे असतात अशात संयुक्त अरब अमिरातील देखील काही कायदे अत्यंत कडक ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची दंड वसुली
मुंबईत कोरोना विषाणुचे संकट कमी होत असले तरी मुंबईकर मात्र कोरोना गांभीर्याने घेत ...

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार
आशिया खंडातील सर्वात मोठा आणि सर्वात प्रतिष्ठित कला महोत्सव म्हणून ओळखला जाणारा काळाघोडा ...

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे आयोजन
पर्यटन संचालनालयामार्फत राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या सहा ...

सीताराम कुंटे राज्याचे नवे मुख्य सचिव

सीताराम कुंटे राज्याचे नवे मुख्य सचिव
राज्याचे नवे मुख्य सचिव ठरले आहेत. या पदावर नक्की कुणाची वर्णी लागणार याकडे सगळ्यांचे ...

पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू

पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू
पुण्याची ‘लाईफलाईन’ असलेल्या पीएमपीएमएलच्या तब्बल ९ हजार ४९८ कर्मचाऱ्यांना संचालक मंडळाने ...

राजीनामा घेतला नाहीतर विधान भवनात सरकारला तोंड उघडू देणार ...

राजीनामा घेतला नाहीतर विधान भवनात सरकारला तोंड उघडू देणार नाही :  चंद्रकांत पाटील
पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड यांच्यावर कारवाई केली नाही त्यांचा राजीनामा घेतला नाही

मनसेकडून 'या' भेटीसंदर्भात स्पष्टीकरण दिले

मनसेकडून 'या' भेटीसंदर्भात स्पष्टीकरण दिले
भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले हे मुंबईत 'कृष्णकुंज'वर

ट्विटर अकाऊंटवरुन टोपे यांची पत्राद्वारे विद्यार्थ्यांना ...

ट्विटर अकाऊंटवरुन टोपे यांची पत्राद्वारे विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा
राज्य शासनाच्या आरोग्य विभागातील पद भरण्यासाठी रविवारी 28 फेब्रुवारी रोजी राज्यातील विविध ...