सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 23 ऑक्टोबर 2021 (21:31 IST)

निर्भया पथकातील पोलीस कर्मचाऱ्याला चौकीत मारहाण

सातारा पोलीस दलातील निर्भया पथकातील सुहास कदम या पोलीस कर्मचाऱ्याला वायसी कॉलेज येथील निर्भया पथकाच्या पोलीस चौकीत जाऊन हर्षल चिकणे याने शिवीगाळ करत मारहाण केली आहे. पोलीस ठाण्यात 353 कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
पोलीस सुहास कदम ड्युटीवर असताना जहीराज जाधव कॉलेजचा मुलगा आहे तो सुहास कदम यांच्या जवळ आला आणि त्यांना म्हटला. मला दोन तीन मुलांनी मारहाण केलेली आहे. त्या प्रमाणे त्याची चौकशी करत असताना त्यांना एक फोन आला कि शिंदे या मुलाची काय भानगड आहे. यावर कदम यांनी सांगितला का त्याला घेवून या आपण चौकशी करू. त्या ठिकाणी हर्षल चिकणे आले आणि त्या मुलाची चौकशी करत असताना पोलीस सुहास कदम यांच्याशी शिवीगाळ, धमकी, धक्का बुक्की करून त्यांनी सरकारी कामामध्ये अडथळा आणला. या घटनेनंतर मारहाण करणारा संशयित आरोपी हर्षल चिकणे फरार झाला आहे. त्याच्यावर शहर पोलीस ठाण्यात 353 कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला, असल्याची माहिती पोलीस निरीक्षक भगवानराव निंबाळकर यांनी दिली आहे.