सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 10 ऑक्टोबर 2019 (15:54 IST)

झोमॅटोच्या एका डिलिव्हरी बॉयने ग्राहकाच्या बीगल प्रजातीच्या कुत्र्यालाच पळवून नेलं

पुण्यात झोमॅटोच्या एका डिलिव्हरी बॉयने ग्राहकाच्या बीगल प्रजातीच्या कुत्र्यालाच पळवून नेलं आहे. कर्वे रोड येथे राहणाऱ्या शहा दांम्पत्यासोबत हा प्रकार घडला असून त्यांनी या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. सोमवारी शहा यांच्या घरातून त्यांचा पाळीव कुत्रा ‘डॉट्टू’ अचानक गायब झाल्याचं वंदना शहा यांच्या लक्षात आलं. त्याचा शोध काही केल्या लागला नाही. 
 
यावेळी त्यांनी घराच्या बाजूला असलेल्या एका रेस्टॉरंटमध्ये काही फूड डिलिव्हरी बॉयकडे डॉट्टूविषयी विचारणा केली. यावर झोमॅटोच्या एका डिलिव्हरी बॉयने डॉट्टूला ओळखलं. डॉट्टू ज्या सहकाऱ्याकडे होता त्याचं नाव संतोष असं असून आपणच डॉट्टूला पळविल्याचं संतोषने मान्य केलं. मात्र डॉट्टूला परत देण्यासाठी तो आढेवेढे घेऊ लागला. इतकंच नाही तर आपण त्या कुत्र्याला गावी पाठविल्याचंही त्याने सांगितलं.