शुक्रवार, 15 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 10 ऑक्टोबर 2019 (10:12 IST)

पुण्यात पावसाचा जबरदस्त तडाखा, राज यांची सभा झाली नाही तर नागरिकांचे मोठे हाल

rain in pune
पुण्यात पावसाने पुनः एकदा जोरदार हजेरी लावली आहे. काही तासांच्या पावसाने पुण्याला पुन्हा वेठीस धरले होते. यात मनसेची होणारी पहिला सभा रद्द करावी लागली तर दुसरीकडे पुण्यातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे..
 
मागच्या दोन आठवड्यांपुर्वी वीसपेक्षा अधिक बळी घेणाऱ्या पावसामुळे जबरदस्त हादरलेल्या सहकारनगर-अरण्येश्वर परिसरातील नागरिकांना पुनः पावसाने धक्का दिला. संध्याकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे अंबिल ओढ्याच्या पाणी पातळीत पुन्हा वाढली होती, हे सर्व पाणी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे वसाहतीमधील 40 पेक्षा अधिक घरांमध्ये घुसले. तर तावरे कॉलनी, शिवदर्शन, पर्वती दर्शन भागामध्ये गटारींमधून पावसाचे वर आलेले पाणी लोकांच्या घरांमध्ये घुसले होते. त्यामुळे  कार्यकर्त्यांनी याठिकाणी तात्काळ मदत कार्य सुरु केले. दोन आठवड्यांपुर्वीच्या पुराच्या आठवणीने नागरिकांच्या अंगावर काटा आला.
 
पुण्यात आलेल्या पुरामुळे सर्वाधिक नुकसान अरण्येश्वर, सहकारनगर परिसरातील नागरिकांचे झाले, टांगेवाला कॉलनीमधील सहा जणांचा या पुरात मागाच्या पावसात बळी गेला होता. तर शेकडो गाड्या पाण्यात वाहात गेल्या होत्या. सोसायट्यांमध्ये पाणी शिरले होते. शेकडो वाहने आठवडाभर पाण्याखाली होती.त्यात पावसाने असा जबरदस्त तडाखा दिल्याने सर्वाना धक्का बसला आहे.