गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 24 जुलै 2017 (11:08 IST)

आदेश बांदेकर सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी

मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचं अध्यक्षपद पुन्हा शिवसेनेकडेच आले आहे. शिवसेना नेते आदेश बांदेकर यांची सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड निश्चित झाली आहे. मात्र आदेश बांदेकर यांच्या नावाची औपचारिक घोषणा बाकी आहे. 

दादरमधून मनसेचे नितीन सरदेसाई यांच्याविरोधात आदेश बांदेकरांनी शिवसेनेच्या तिकिटावर विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यात ते पराभूत झाले. मात्र, त्यानंतर त्यांच्याकडे शिवसेनेच्या सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. आता अत्यंत प्रसिद्ध अशा सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड निश्चित झाल्याने आदेश बांदेकरांकडे मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.