Widgets Magazine
Widgets Magazine

इनोव्हा आणि ट्रकचा भीषण अपघात, ३ ठार

मुंबई| Last Modified सोमवार, 14 नोव्हेंबर 2016 (17:09 IST)
आग्रा महामार्गावर असलेल्या वाडीवऱ्हे येथील आठवा मैलजवळ झालेल्या अपघातामध्ये काका – पुतणीसह कारचालक यांचा मृत्यू झाला आहे. तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. यात इनोव्हाचा चालक भाऊसाहेब गांगुर्डे (४५) याचा जागीचा मृत्यू झाला तर मानसी चौधरी(१३) आणि तिचे काका मुकेश चौधरी (३५) याचा रुग्णालयात नेत असतांना मृत्यू झाला आहे.
Widgets Magazine

नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील नामपूर येथे काकांकडे दिवाळीच्या सुट्टीसाठी आलेले मुळचे कल्याणचे असलेले अंकित आणि मानसी हे काकांसोबत घरी परतत होते. त्यावेळी इनोव्हा कारचालकाला अंधारात उभा असलेला ट्रक दिसला नाही. आणि अपघात झाला. यात भरधाव वेगात असलेली इनोव्हा गाडी ट्रकला आदळली. इनोव्हा गाडीत असलेले ५ पैकी ३ जण ठार झाले.


Widgets Magazine

यावर अधिक वाचा :