शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 23 मे 2023 (10:02 IST)

Accident at Buldhana: बस आणि कंटेनरचा भीषण अपघात, 5 ठार

accident
बुलढाणा: औरंगाबादहून  मेहकरला जाणाऱ्या एसटीबसचा बुलडाण्याजवळ मंगळवारी भीषण अपघात झाला. समोरून येणाऱ्या कंटेनरमध्ये बस घुसली आणि अपघात झाला. या अपघातात बस चालकासह 5 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर 15 जण गंभीर जखमी झाले आहे.
 
 हा अपघात सकाळी 6 वाजेच्या दरम्यान मुंबई -औरंगाबाद महामार्गावर पळसखेडा चक्का गावाजवळ झाला. बस आणि कंटेनरची समोरासमोर धडक झाली या अपघातात 5 जण जागीच  ठार झाले. अपघाताची माहिती मिळतातच स्थानिक नागरिक तातडीने मदतीला आले. या अपघातात बसचालकाचा मृत्यू झाला आहे. तर 15 जण गंभीर जखमी झाले आहे.त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात  आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.  ही अपघातग्रस्त बस औरंगाबादहून मेहकरच्या दिशेने जात होती. अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती.
 
 
Edited by - Priya Dixit