testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

मिरज-पंढरपूर रस्त्यावर अपघात, एकाच कुटुंबातील ६ जण ठार

accident
Last Modified शुक्रवार, 21 एप्रिल 2017 (14:48 IST)
कवठेमहांकाळ तालुक्यातील मिरज-पंढरपूर रस्त्यावर आगळगाव फाटा येथे शुक्रवारी पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाले आहेत. आगळगाव
फाटा येथे रस्त्याच्या कडेला थांबलेल्या वाळूच्या ट्रकवर मागच्या बाजूने मिनी बस येऊन आदळली. ही धडक इतकी जोरदार होती की, मिनी बसच्या पुढच्या बाजूचा चूराडा झाला आहे. अपघातग्रस्त मिनीबसमधील सर्वजण कोल्हापूर जिल्ह्यातील मालेगावचे रहिवासी आहेत. पंढरपूर येथून देवदर्शन करुन परतत असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. मृतांची नावे अशी
विनायक मार्तंड लोंढे (५०),गौरव राजू नरदे (९),
लखन राजू संकाजी ( ३०),
रेणुका नंदकुमार हेगडे (३५),
नंदकुमार जयराम हेगडे ( ४०) आणि
आदित्य नंदकुमार हेगडे (१३ ).


यावर अधिक वाचा :