गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 11 जून 2023 (13:26 IST)

Accident : वारीच्या पहिल्या दिवशी एसटीचा अपघात

accident
पंढरपूरच्या आषाढी वारीला आजपासून सुरुवात झाली असून आज पहिल्याच दिवशी मोठा अपघात झाला आहे. पुरंदर तालुक्यात पुढे पंढरपूर मार्गावर भोरवाडीफाटा येथे एसटी बस आणि पिकअप वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात सहा वारकरी जखमी झाले आहे.  

पंढरपूरहुन पुण्याकडे निघालेली एसटी बस आणि पुणे कडून वाल्हेकडे निघालेल्या पिकअप टेम्पोची अमोरासमोर धडक झाली. एसटीचा टायर फुटून हा अपघात झाला. या अपघातात 6 वारकरी जखमी झाले आहे. एका प्रवाशाचे पायाचे हाड मोडून डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. 

जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पालखी महामार्गावर जेजुरी जवळ भोरवाडी फाटा येथे वारकऱ्यांना घेऊन जाणारी बस आणि कोंबड्यांना घेऊन जाणाऱ्या पिकअप वेन ची अमोरासमोर धडक झाली.रात्री आठ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने या अपघातात जीवित हानी झाली नाही.  
 
Edited by - Priya Dixit