1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 17 नोव्हेंबर 2020 (08:54 IST)

बीड अॅसिड हल्ला प्रकरणातील आरोपीला ८ दिवसांची पोलीस कोठडी

बीड येथे तरुणीवर अॅसिड हल्ला करुन तिला पेट्रोल टाकून जाळून मारल्याबद्दल अटकेत असलेला आरोपी अविनाश राजुरे याला सत्र न्यायालयाने ८ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. शनिवारी घडलेल्या या घटनेनंतर २४ तासांतच पोलिसांनी फरार आरोपी राजुरे याला नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथून रविवारी अटक केली होती.
 
बीड तालुक्यातील येळंबघाट येथे शनिवारी २२ वर्षीय तरुणी जळालेल्या अवस्थेत आढळून आली होती. पोलिसांना याची खबर मिळताच पीडित तरुणीला उपचारांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान, रविवारी सकाळी या तरुणीचा मृत्यू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात होता. 
 
दिवाळीसाठी पुण्याहून गावी परतणाऱ्या तरुणीवर अ‍ॅसिड हल्ला करून नंतर पेट्रोल टाकून जिवंत जळल्याची घटना येळंबघाट (ता. बीड) येथे घडली होती. गंभीररित्या भाजलेल्या तरुणीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असतांना रविवारी पहाटे तिचा मृत्यू झाला.  दरम्यान, याप्रकरणातील आरोपी व मृत तरुणी दोघे पुण्यात सोबत (लिव्ह इन रिलेशनशिप) राहत होते अशी माहिती समोर आली आहे.