शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 16 नोव्हेंबर 2019 (10:21 IST)

#पुन्हानिवडणूक, लवकरच भूमिका मांडू, मराठी कलाकारांचे स्पष्टीकरण

मराठी कलाकारांनी एकाचवेळी ट्विटरवर #पुन्हानिवडणूक हा हॅशटॅग वापरत ट्वीट केले होते. यावर टीका झाल्यानंतर मराठी कलाकारांकडून याबाबतचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. आमची कुणाचीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न नाही, याबाबत लवकरच भूमिका मांडू, असे स्पष्टीकरण कलाकारांनी दिले  आहे.
 
“आमची पोस्ट ही कोणत्याही युती, आघाडी किंवा राजकीय पक्षाचं प्रमोशन किंवा खंडन करण्यासाठी नाही. राजकारण म्हणलं की निवडणूक आलीच. हाच निवडणुकीचा ‘धुराळा’ आपलं आयुष्य कसं बदलतो याचा अनुभव आपण घेतो आहोतच. असंच काहीसं आमच्याही बाबतीत झालंय, म्हणून आपल्याशी ते शेअर केलं. त्यामागची आमची ‘भूमिका’ लवकरच कळेल, आणि आशा आहे आपल्याला आवडेल सुद्धा. सर्वाच्या भावनांचा आम्हाला नितांत आदर आहे. कुणाचीही कुठल्याही प्रकारची दिशाभूल करण्याचा आमचा हेतू नाही,” असे स्पष्टीकरण अभिनेता सिद्धार्थ जाधव, सई ताम्हणकर यासारख्या मराठी कलाकरांनी दिले आहे.
 
मराठी अभिनेते अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, सोनाली कुलकर्णी, सई ताम्हणकर यांच्यासह अनेकांनी सकाळी 10.30 ते 11 च्या दरम्यान #पुन्हानिवडणूक हा एकच हॅशटॅग वापरुन ट्विट केलं होतं.