शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 24 मे 2022 (08:22 IST)

अहमदनगर : भीषण अपघातात बाप-लेक ठार

समोर चाललेल्या वाहनाला कारची पाठीमागून धडक बसून भीषण अपघात झाला.यामध्ये जळगाव जिल्ह्यातील बाप-लेकाचा मृत्यू झाला आहे.
अहमदनगर-पुणे महामार्गावरील कामरगाव शिवारात हा अपघात झाला.बाजीराव मिसकर व ओम मिसकर असे मयत बाप-लेकाची नावे आहेत.
ते त्यांच्या कारमधून जेजुरी येथे देव दर्शनाला जात असताना हा अपघात झाला.अपघात एवढा भीषण होता की कारचा चक्काचूर झाला. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.