Widgets Magazine

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार

अहमदनगर - संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली. याप्रकरणी उबेद मन्सूर पटेल याच्या विरुद्ध अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल केला असून घारगाव पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पठार भागात राहणार्‍या उबेद मन्सूर पटेल याने येथीलच एका तरुणीला साकूर फाट्यावर बोलावले व त्याच्या वेगनार गाडीमधून तिला नांदूरशिंगोटे गावाजवळील एका लॉजवर नेले आणि त्या ठिकाणी लग्नाचे आमिष दाखवून दि.३१ नोव्हेंबर २०१६ ते १० फेब्रुवारी २०१७ या कालावधीत तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर माझ्याशी लग्न कधी करणार आहे?

असे तरुणीने उबेद पटेल यास विचारले असता मी तुझ्याशी लग्न करणार नाही, तुला काय करायचे ते कर असे म्हणून तिला दम दिला.

त्यामुळे पिडीत तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरुन घारगाव पोलिसांनी उबेद मन्सूर पटेल याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याला घारगाव पोलिसांनी अटक केली आहे.


यावर अधिक वाचा :