मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 1 सप्टेंबर 2020 (16:12 IST)

अजितदादांनी केली राजू शेट्टींची ही मागणी तातडीने मंजूर

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये करोना संसर्ग मोठ्या प्रमाणात झाला आहे. रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहेत. राज्य सरकारने तातडीने या दोन जिल्ह्यांमध्ये लक्ष घालून व्हेंटिलेटरची सुविधा पुरवावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. येत्या चार दिवसात कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात व्हेंटिलेटरसहित अतिदक्षता विभागासाठी बेड पुरवू, असे आश्वासन अजित पवार यांनी शेट्टी यांना दिले आहे. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात करोनाचा (coronavirus)प्रादुर्भाव वाढत आहे. व्हेंटिलेटर अभावी रूग्ण दगावत आहेत. त्यातच या दोन्ही जिल्ह्यात आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्याही कमी आहे. मुंबईमध्ये करोनाचा संसर्ग कमी होत आहे. तेथील व्हेंटिलेटर सांगली व कोल्हापूर जिल्ह्यासाठी देण्यात यावे. तसेच खासगी रुग्णालयातही बेड अपुरे पडत आहेत. ऑक्सिजनची पातळी खालावल्यास रुग्णांना तातडीने बेड मिळत नाहीत. त्यामुळे व्हेंटिलेटर अभावी रुग्ण दगावत आहेत. परिणामी सांगली जिल्ह्यातील मृत्यू दर सर्वाधिक झाला आहे. ही परिस्थिती नियंत्रणाय यावी म्हणून गेले दोन दिवस मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी संपर्क साधतो आहे, असं राजू शेट्टी म्हणाले.