सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 23 ऑगस्ट 2022 (09:17 IST)

आमदारांनी अडथळा आणल्यानंतर अजितपवार चांगलेच संतापले

ajit pawar
विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार हेही आक्रमक झालेले दिसले. विशेष म्हणजे निधीच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून बोलत असताना सत्ताधारी बाकावरील काही आमदारांनी अडथळा आणल्यानंतर पवार चांगलेच संतापलेले दिसले. यावेळी त्यांनी “अरे थांब ना बाबा, तुलाच फार कळतंय का? आम्ही इथं गोट्या खेळायला आलो आहे का?”, असा सवाल केला.
 
अजित पवार म्हणाले, “देवेंद्रजी मला तुम्हाला स्पष्ट सांगायचं आहे की आपण मनाचा मोठेपणा दाखवा. पाठीमागच्या काळात देखील २५-१५ चा निधी देण्याची कल्पना या नेत्यांच्या सुपिक डोक्यातून आली होती. २५-१५ आणि ठोक तरतूद असे निर्णय घेण्यात आले. त्याचा वापर मीदेखील मोठ्या प्रमाणात करून घेतला. याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. २५-१५ चा निधी देताना आम्ही महाविकासआघाडीमधील लोकांना पाच कोटीचा निधी दिला हे मी मान्य करतो. परंतु त्याचवेळी आम्ही तुमच्याकडून याद्या घेऊन तुमच्याही आमदारांना दोन दोन कोटी रुपये दिले.”