1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 19 फेब्रुवारी 2022 (21:34 IST)

अजित पवारांची भावनिक बाजू पुन्हा आली समोर, एसटी कर्मचाऱ्यांना केले भावनिक आवाहन

Ajit Pawar's emotional side came to the fore again
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांना भावनिक आवाहन केलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून एसटीच्या विलीकरणाचा मुद्दा तापला आहे. यावरून राज्य सरकारने सतर्क होत ऐतिहासिक पगारवाढही केली मात्र तरीही संपाचा मुद्दा पूर्ण निकालात निघाला नाही. आता हे प्रकरण कोर्टात आहे. यावर बोलताना एसटी कर्मचाऱ्यांना माझी हात जोडून विनंती आहे, जेवढी काय मदत करायची होती ती केली आहे, विलीनीकरणाचा कोर्टात अहवाल गेला आहे, जो काही निर्णय येईल तो मान्य करावा लागेल. मात्र गरिबांच्या मुलांसाठी शाळेत जाण्यासाठी एसटीची गरज आहे. आता कुठेतरी हे संपाचं हत्यार थांबलं पाहिजे, असे संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना अजित पवारांनी भावनिक आवाहन केलं आहे.