शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 20 जून 2023 (08:45 IST)

महाविकास आघाडी सरकार पाडण्यात अजित पवार अर्थमंत्री असताना मोठी मदत झाली-गिरीश महाजन

girish mahajan
महाविकास आघाडी सरकार पाडण्यात अजित पवार अर्थमंत्री असताना मोठी मदत झाली, असा खळबळजनक दावा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. महाजन यांच्या या दाव्याने आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
 
नाशिकमध्ये काल व्यापारी गटाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, अजित पवार अर्थमंत्री असताना मविआचे सरकार पाडण्यात त्यांची मोठी मदत झाली होती. दरम्यान, आता नव्या सरकारमधील मंत्रिमंडळ विस्तारासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीला जाऊन आले असून, चर्चा सुरू आहे. त्यामुळे लवकरच निर्णय होईल. खाते आणि नावानूसार चर्चा सुरू आहे. शिवसेनेच्या कोणत्या मंत्र्यांवर भाजप नाराज असे काहीही नाही. शिवसेनेचा निर्णय मुख्यमंत्री घेत आहेत, भाजपचे भाजपकडे आहे.
 
दरम्यान, ठाकरे गटाला रोजच धक्के बसत आहेत. त्यांना अनेक झटके बसत आहेत आणि पुढेही बसणार आहेत. सकाळच्या भोंग्याशिवाय त्यांच्यासोबत कोणीही नाही. अनेक आमदार, खासदारही पुढे त्यांना सोडून जाणार असल्याचेही महाजन म्हणाले.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor