1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 28 ऑक्टोबर 2020 (10:14 IST)

काकड आरती, कार्तिक स्नान सोहळा यांना परवानगी द्या

Allow Kakad Aarti
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत असून वारकरी काकडा आरती कार्तिक स्नान सोहळा 31 ऑक्टोबर 2020 पासून सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र वारकरी महामंडळाने केली आहे.
 
यासंदर्भात महामंडळाच्या वारकरी भक्तांनी पुण्याचे सहपोलीस आयुक्त सुधीर हिरेमठ यांना निवेदन दिले. त्यात त्यांनी म्हटले आहे की, वारकरी काकडा आरती कार्तिक स्नान सोहळा २०२० 31 ऑक्टोबर पासून सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी. सोशल डिस्टंसिंगचे पूर्णपणे पालन करूनच काकड आरती सोहळा घेतला जाईल, असे वारकरी मंडळांने म्हटले आहे.