रविवार, 28 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated :लातूर , गुरूवार, 19 मार्च 2020 (13:46 IST)

कोरोनाच्या धास्तीने अमरावती-पुणे रेल्वे रद्द

लातूरहून पुण्याला जाण्यासाठी मंगळवारी व रविवारी सकाळी साडेसहा वाजता सुटणारी अमरावती-पुणे ही रेल्वे कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी रद्द करण्यात आली आहे. यामुळे लातूरहून पुण्याला जाणार्‍या प्रवाशांना आता सकाळी रेल्वे मिळणार नाही. ही रेल्वेसेवा पुढच्या आठवड्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे. चीनहून आलेल्या कोरोना विषाणूच्या आजाराने भारतातही पाय पसरवण्यास सुरुवात केली आहे. या आजारावर नियंत्रणासाठी केंद्र व राज्य सरकारने ठोस उपाययोजना आखण्यास सुरुवात केली आहे. आजाराचे लोण महाराष्ट्रातही येत आहे. सर्वाधिक रुग्णांची संख्या पुणे येथे असल्याचे दिसून येते. यामुळे पुण्यातील नागरिक गावाकडे स्थलांतरित होऊ लागले आहेत. त्यांच्या येण्याने गावांमध्ये कोरोनाच्या भीतीचे वातावरण पसरले आहे. प्रवाशांची संख्या वरचेवर रोडावत चालली आहे. मुंबई-पुण्याहून गावाकडे येणार्‍यांची संख्या वाढत आहे. यामुळे येणार्‍या रेल्वे, बसेस, खासगी प्रवासी वाहतूक यांना मोठी गर्दी होत आहे. सर्वच कार्यालये, रेल्वे सेवा बंद केल्याने व कोरोनाच्या भीतीने ग्रामीण भागातील नागरिक आपले नियोजित दौरे पुढे ढकलत आहेत. कोरोनाचा फैलाव आटोक्यात आणण्यासाठी रेल्वे प्रशासनाने अमरावती-पुणे ही आठवड्यातून मंगळवारी व रविवारी लातूर स्थानकातून धावणारी रेल्वे सेवा बंद केली आहे.
 
शासनाने 31 मार्चपर्यंत सर्वच शासकीय व निमशासकीय संस्थाने, शाळा-महाविालये, खासगी शिकवण्या, मॉल,स्विगिं पूल आदी ठिकाणे बंद केली आहेत. आठवडी बाजारही भरवण्यास बंदी घातली आहे. सार्वजनिक यात्रा, उत्सव यावरही बंदी आणली आहे. याचाच एक भाग म्हणून अमरावती-पुणे रेल्वेही बंद करण्यात आली आहे. |