मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 28 ऑगस्ट 2022 (17:35 IST)

Amravati: अमरावतीत गॅस सिलेंडरच्या स्फोटात 2 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

अमरावतीमधील एका चिमुकलीला अशाच फुग्याच्या मोहापायी जीव गमवावा लागला आहे. यात्रेतील फुगेवाल्याकडून गॅसचा फुगा घेत असताना गॅस सिलेंडरचा अचानक स्फोट  झाला, या स्फोटात चिमुकलीचा पाय हा शरीरापासून वेगळा झाला आहे. परी असे या चिमुकलीचे नाव आहे.
 
अचलपूर तालुक्यातील शिंदी बुद्रुक येथील ताना पोळ्याच्या यात्रेत परी सागर रोही ही 2वर्षीय चिमुकली आपल्या आजोबांसह गेली होती. यात्रेत गॅसचे फुगे दिसल्याने तिने गॅसचा फुगा घेऊन देण्याचा हट्ट आपल्या आजोबांकडे केला. रंगीबेरंगी फुगे पाहून चिमुकली परी आपल्या आजोबांसोबत फुगे विक्रेत्याजवळ पोहचली. यावेळी फुगे पाहत असताना अचानक फुगेवाल्याजवळ असणाऱ्या गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. या भीषण स्फोटात दोन वर्षीय परीचा एक पाय शरीरापासून वेगळा झाला आणि ती गंभीर जखमी झाली.तर यात्रेत आलेले अनेक जण जखमी झाले.
तिला तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान या चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू झाला.या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.