गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 16 फेब्रुवारी 2021 (10:34 IST)

अमृता फडणवीस याचं व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने एक खास गाणं प्रसिद्ध

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने एक खास गाणं प्रसिद्ध केलं आहे. व्हॅलेंटाईन डेच्या संध्याकाळी त्यांनी हे गाणं आपल्या अधिकृत फेसबुक आणि युट्यूबवर शेअर केले आहे. सध्या सोशल मीडियावर हे गाणं तुफान व्हायरल होत आहे. 'ये नयन डरे डरे' असं या गाण्याचे नाव आहे. हे गाणं समुद्र किनाऱ्यावर चित्रीत करण्यात आलं आहे. 
 
व्हेलेंटाइन डे विक दरम्यान त्यांनी नेटकऱ्य़ांना नव्या भेटीसंबंधी संकेत दिले होते. त्यावेळी या खास भेटीविषयी चर्चा देखील रंगली होती. मात्र ही भेट त्यांनी व्हेलेंटाइन डे पर्यंत गुपीत ठेवली.