गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

अमृता फडणवीस यांचा चॅरिटी शो मध्ये सहभाग

‘जय हो’ नावाच्या एका चॅरिटी म्युझिक शोमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सहभागी झाल्या होत्या.  लॉस एंजलिस आणि कॅलिफोर्निया या ठिकाणी अमेरिकन असोसिएशन ऑफ फिजिशिअन्स ऑफ इंडियन ओरिजिन यांनी या शोचं आयोजन केलं होतं.

हृदयविकार, ल्युकेमिया आणि संदर्भातले आजार असलेल्या भारतातल्या आणि अमेरिकेतल्या रूग्णांच्या मदतीसाठी हा चॅरिटी शो आयोजित करण्यात आला होता. या शोमध्ये अमृता फडणवीस यांचा सहभाग होता. आपल्याला या शोमध्ये सहभागी होऊन खूपच आनंद झाला अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी इंस्टाग्रामवर लिहिली आहे. तसेच या कार्यक्रमातले फोटोही पोस्ट केले आहेत.