मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 4 जुलै 2021 (10:10 IST)

पालघर जिल्ह्यातील केमिकल फॅक्टरीत स्फोट,अनेक जण जखमी झाले

महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील केमिकल कंपनीच्या प्लांटमध्ये झालेल्या स्फोटात लागलेल्या आगीत पाच कामगारांचा होरपळून मृत्यू झाला.शनिवारी रात्री उशीरा बोईसर औद्योगिक क्षेत्रात असलेल्या केमिकल प्लांटमध्ये हा स्फोट झाला, अशी माहिती अग्निशमन अधिकाऱ्यांनी रविवारी दिली.याची माहिती मिळताच स्थानिक अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मदत व बचावकार्य राबवले.
 
बोईसर पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्याने सांगितले की,“स्फोटानंतर लागलेल्या आगीत पाच कर्मचारी जळाले.या आगीत जखमी झालेल्या लोकांना तातडीने त्यांना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
 
ते म्हणाले की हा स्फोट का झाला हे अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणाची तपासणी सुरू आहे.