गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 3 मार्च 2024 (16:21 IST)

मोक्षप्राप्तीसाठी जिवंतपणी केली अंधश्रद्धेची संतापजनक घटना

मृत्यू नंतर मोक्ष मिळते हे सर्वानाच माहित आहे. पण एखाद्याने जिवंतपणी स्वर्गात मोक्षप्राप्ती मिळवण्यासाठी मृत्यूची तयारी करण्याची धक्कादायक घटना हिंगोली तालुक्यात बासंबा पोलीस स्टेशनच्या हद्दीत लिबी गावात अंधश्रद्धेचा प्रकार समोर आला आहे. 

विज्ञानाने जरी कितीही प्रगती केली आहे तरीही देशातील अनेक भागातील लोक अंधश्रदेला बळी पडतातच. हिंगोली तालुक्यात लिबी गावातील धोंडबाराव देवकते यांनी मृत्यू नंतर मोक्ष मिळावं या साठी स्वतः आपल्या मृत्यूची कहाणी लिहिली असून त्यांना बघण्यासाठी  जवळच्या गावातील लोकांनी गर्दी केली आहे.माझा मृत्यू २:५७ वाजता होणार आणि हे अटळ आहे असे म्हणत देवकते एकाच जागी बसून आहे. पोलीस ठाण्यात हा प्रकार घडला असून पोलिसांना अद्याप याची कल्पना नसल्याचे पोलिसांनी सांगितले. काही महिलांनी या व्यक्तीची पूजा अर्चा देखील सुरु केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.  
 
Edited By- Priya Dixit