रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 13 जुलै 2021 (10:54 IST)

ईडीच्या रडारवर अनिल देशमुख यांचा मुलगा सलील,300 कोटींच्या जमीन करार प्रकरणी चौकशी सुरू

महाराष्ट्रातील माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा सलील देशमुख यांनी खरेदी केलेल्या15 भूखंडांची अंमलबजावणी संचालनालय (ईडी) चौकशी करीत आहे. कागदपत्रांवरून हे भूखंड प्रीमियर पोर्ट लिंक्स प्रायव्हेट लिमिटेडच्या नावे विकत घेतले गेले होते, या मध्ये सलिल देशमुख यांचे नियंत्रण आहे.एनएच 8 348 पलास्पे फाटा ते जेएनपीटी ते थोड्या अंतरावर 8.3 एकर जमीन आहे.या पैकी एक तुकडा जमीन स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबाकडून खरेदी करण्यात आला.
 
ईडीच्या सूत्रांनी खुलासा केला आहे की सलीलचा या कंपनीत नियंत्रण आहे.तथापि,यासंदर्भात अनिल देशमुख यांना पाठविलेले ईमेल व एस एम एस संदेशास कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हे जमीन व्यवहार 2006 ते 2015 दरम्यान झाले. त्या भागाची पाहणी केली असताना एकमेकाला लागून अनेक भूखंड विकत घेतल्याचे आढळले.उरण तहसीलच्या जसाई तलाठी सीमेच्या धूतुम गावात ही जमीन असल्याचे सांगितले जात आहे.
 
दिवंगत स्वातंत्र्यसेनानी रामदशेठ ठाकूर यांचे नातेवाईक चंद्रभागा पाटील म्हणाले,“हे भूखंड अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांना विकले गेले. हे कंपनीच्या (प्रीमियर पोर्ट लिंक्स प्रायव्हेट लिमिटेड) नावे नोंदणीकृत केले आहे. या व्यतिरिक्त बऱ्याच शेतकऱ्यांनी त्यांची जमीन विकली आणि बहुतेकांना रोख रकम दिली गेली.