रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 24 जानेवारी 2022 (10:02 IST)

दिवसाढवळ्या कोयत्याने सपासप वार करून बारावीतील विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला

लातूर : दिवसाढवळ्या एका तरुणावर कोयत्याने सपासप वार केल्याच्या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. शहरातीलचं विशाल नगर परिसरात एका महाविद्यालयीन तरुणावर हल्ला करण्यात आला आहे. हल्ला करताना आरोपीने कोयत्याने सपासप वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राहुल सुरेश उजळंबे असं हल्ला झालेल्या तरुणाचं नाव असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
 
अज्ञात मारेकऱ्यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यावर कोयत्याने वार करत त्याला रक्ताच्या थारोळ्यात पाडलं. रविवार दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. या घटनेचा माहिती मिळताच अवघ्या काही मिनिटातच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
 
लातूर शहरातील अत्यंत गजबजलेला भाग असलेल्या विशाल नगर परिसरात काही अज्ञात मारेकऱ्यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यावर कोयत्याने वार करत खून केला.
 
पोलिसांनी गंभीररित्या जखमी झालेल्या तरुणाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. याठिकाणी त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. 
 
संबंधित तरुणावर कोणी हा हल्ला केला आहे तसेच यामागील कारण काय याची कोणतीही माहिती अद्याप पोलिसांना मिळाली नाही. पोलिसांनी घटनेची दखल घेतली असून मारेकऱ्यांचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल नगर परिसरातील साई मंदिरा शेजारील चौकात हा हल्ला झाला आहे. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.