मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 फेब्रुवारी 2022 (21:49 IST)

प्रियकराला घरच्या लोकांच्या मदतीने जिवंत जाळल्याचा केला प्रयत्न

प्रेम प्रकरणातून मुलगी आणि तिच्या घरच्यांनी एका युवकाला जिवंत जाळल्याची  घटना नाशिकमधील देवळा तालुक्यात लोहणेर घडली आहे. याप्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, संबंधित मुलीसह पाच आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या हल्ल्यात पीडित युवक 55 टक्के भाजला असून त्याच्यावर देवळा येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गोरख काशीनाथ बच्छाव असे पीडित तरुणाचे नाव आहे. देवळा पोलिसांनी संबंधित मुलगी, तिचे आई वडिल आणि दोन भाऊ यांना ताब्यात घेतले आहे. यापैकी एक आरोपी अल्पवयीन आहे. 
 
मालेगाव तालुक्यातील रावळगाव येथील रहिवासी असलेल्या मुलीचे देवळा तालुक्यात लोहणेर येथील गोरख बच्छाव सोबत सात वर्षापासून प्रेमसंबंध होते.  मात्र दोन महिन्यांपूर्वीच त्यांचे ब्रेक अप झाले होते.  दोघांच्या ब्रेकअपनंतर मुलीचे दुसरीकडे लग्न ठरले होते. मात्र काही कारणाने हे लग्न मोडले. त्यामुळे गोरखनेच मुलीच्या सासरच्यांना सांगून लग्न मोडले, असा मुलीला आणि तिच्या घरच्यांना संशय होता. याच संशयातून त्यांनी गोरखला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. मुलीच्या आई, वडील व दोन भाऊ यांनी संगनमताने मुलाच्या डोक्यात वार करुन मुलीने अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. यात तरुण 55 टक्के भाजला.   देवळा पोलिसांनी  युवकाला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले.